मुंबई नगरी टीम
सोलापूर : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या दुष्काळी भागात दौ-यावर आहेत. मोहोळ तालुक्यातील एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तुम्ही मतदान कुणालाही करा.मी शिवसेनेची सामाजिक बांधिलकी सांगायला आलोय, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. मराठवाडा आणि सोलापूरमध्ये शिवसेनेचे एकेकाळी असलेले महत्त्व आता ओसरले आहे. शिवसेनेला निवडणुकीत जोरकस बनवण्याच्या उद्देश्याने त्यांचा हा दौरा आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, दुष्काळ कितीही गंभीर असला तरीही शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.शिवसेनेचे नाव घ्या. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मदतीचे वाटप करण्यात आले.
आदित्य ठाकरे म्हणाले की,मतदान तुम्ही कोणत्याही पक्षाला करा.तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याच्याशी काही संबंध नाही. तुमच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी बोलणार आहे.आदित्य ठाकरे यांचा दौरा शिवसेनेची स्थिती किती मजबूत आहे याची चाचपणी करण्यासाठी होता. येथे काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी लढत होणार आहे.