नक्षलवादी हल्ल्यांच्या  घटनेचे विरोधकांनी राजकारण करू नये

नक्षलवादी हल्ल्यांच्या  घटनेचे विरोधकांनी राजकारण करू नये

मुंबई नगरी टीम

मुंबई : गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात १६ पोलीस जवान शाहिद झाले.या  नक्षलवादी हल्ल्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आला आहे. अशा नक्षलवादी हल्ल्यांवरून विरोधी पक्षांनी राजकारण खेळू नये.सरकार कुणाचेही असो नक्षलवादी हल्ल्यासारखी निषेधार्ह घटना घडल्यानंतर जनतेने सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी  मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

नक्षलवादी हल्ल्यांसारखी  घटना घडते त्यावेळी सरकार आणि विरोधी पक्षाचा एकच सूर असला पाहिजे. काँग्रेसच्या सत्तेच्या काळातही नक्षलवादी दहशतवादी हल्ले झाले होते. त्यामुळे आता नक्षलवादी हल्ला झाला म्हणून  सरकारवर टीका करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागून आपल्यात फूट आहे हे दाखविणे योग्य नाही.नक्षलवाद संपविण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्ष सर्वांनी एकजूट दाखविली पाहिजे. विरोधी पक्षाने टीका करून राजीनामा मागण्यापेक्षा नक्षलवाद कसा रोखता येईल याबाबतच्या सूचना केल्या पाहीजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले असून, नक्षलवाद रोखण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. तरीही गडचिरोली मध्ये झलेला नक्षलवादी हल्ला आमच्या सरकारला मान खाली घालण्यासारखी घटना घडली आहे असे  आठवले म्हणाले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच खरे कामगारांचे कैवारी आहेत. त्यांनी कामगारांसाठी ८ तास ड्युटीचा कायदा आणला. साप्ताहिक सुट्टी ची तरतूद केली. कामगारांसाठी अनेक  सुविधा हक्क मिळवून देण्याचे काम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे असे आठवले यावेळी म्हणाले.कामगारांसाठी ८ तासांऐवजी ६ तास ड्युटी करण्याची आपण मागणी केली होती अशी आठवण यावेळी  आठवले यांनी  उपस्थितांना करून दिली.

Previous article“जांभूरखेडा” घटनेची पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी करणार
Next articleमराठवाड्याला राज्याच्या अन्य धरणांतून पाणी देण्याची  पंकजा मुंडेंची मागणी