पंकजाताईंच्या  प्रयत्नाने परळी शहरात होताहेत दर्जेदार अंतर्गत रस्ते

पंकजाताईंच्या  प्रयत्नाने परळी शहरात होताहेत दर्जेदार अंतर्गत रस्ते

मुंबई नगरी टीम

परळी : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे शहरातील नागरिकांना सध्या दर्जेदार व चांगले अंतर्गत रस्ते पहायला मिळत आहेत, पहिल्यांदाच चांगली कामं होत असल्याचे पाहून नागरिकही खूश आहेत. या रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी ना. पंकजाताई मुंडे यांनी शासनाकडून मंजूर करून घेतला होता, त्यांच्या सूचनांमुळेच रस्त्याची कामे दर्जेदार व गतीने पुर्ण होत आहेत.

नगरपरिषदेतील सत्ताधा-यांचे शहरातील नागरी समस्यांकडे सध्या साफ   दुर्लक्ष आहे. अंतर्गत रस्त्याचीही दुर्दशा झाल्याने रहिवाशी त्रासले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांचा त्रास दूर करण्यासाठी पालकमंत्री  पंकजा मुंडे यांनी विशेष प्रयत्न करून शासनाच्या  नगर विकास विभागाकडून अंतर्गत रस्त्यासाठी पांच कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. रस्ता कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाल्यानंतर ही कामे सुरू झाली. या निधीतून शहराच्या विविध प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची २६ कामे होत असून त्यातील शिवाजीनगर, माणिकनगर, मोंढा विभाग, नरहरी महाराज मंदिर, खुदबेनगर, शिवाजीनगर (भगवानबाबा मंदिर), काळरात्री मंदिर परिसर आदी भागातील ११ कामे आजमितीला पुर्ण झाली आहेत.

पंकजा मुंडे यांनी सदर कामे दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला केल्या होत्या, शिवाय वारंवार त्याविषयी आढावा घेतला होता, त्यांनी केलेल्या सूचनांमुळे आज जी कामे पुर्ण झाली आहेत किंवा प्रगतीपथावर आहेत, त्याचा  दर्जा चांगल्या प्रकारे राखला जात असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या अंदाधुंद व ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही  शहरातील नागरिकांना आतापर्यंत चांगली कामं दिसत नव्हती पण पंकजा मुंडे यांनी नागरिकांच्या हिताचा विचार करून रस्ते दर्जेदार केल्यामुळे नागरिकही खूश आहेत.

Previous articleआचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका
Next articleपिण्याच्या पाण्याच्या कामांना १५ जूनपर्यंत मुदतवाढ