गेल्या सहा महिन्यांपासून धर्मादाय आयुक्त पद रिक्त

गेल्या सहा महिन्यांपासून धर्मादाय आयुक्त पद रिक्त

मुंबई नगरी टीम

मुंबई :  महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त हे पद गेल्या सहा दिवसांपासून रिक्त असल्याची माहिती अधिकारामुळे उजेडात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीमुळे बाब समोर आली आहे. राज्यातील पब्लिक ट्रस्ट तसेच अन्य संस्थेच्या कामकाजावर लक्ष ठेवत कल्याणकारी योजना राबविण्याची जबाबदारी धर्मादाय आयुक्त यांच्यावर आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे याबाबत माहिती विचारली होती. धर्मादाय आयुक्त हे पद केव्हापासून रिक्त आहे आणि हे पद नियुक्त करण्याची जबाबदारी कोणाची आहे अशी विचारणाही त्यांनी माहिती अधिकारात विचारली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने कळविले की, धर्मादाय आयुक्त पद हे दिनांक ५ डिसेंबर २०१८ पासून रिक्त आहे. तसेच धर्मादाय आयुक्त या पदाची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. मागील आयुक्त शिवकुमार डिगे यांची नियुक्ती शासनाने दिनांक १८ ऑगस्ट २०१७ रोजी केली होती. शिवकुमार डिगे यांनी लेखापरीक्षण न करणाऱ्या संस्थावर कार्यवाहीचा बडगा उचलत धर्मादाय रुग्णालय प्रशासनास धर्मादाय असे लिहिण्यास बाध्य केले होते. तसेच मानवाधिकार आणि भ्रष्टाचार या शब्दाचा वाढलेला दुरुपयोग पहाता असे शब्द वगळण्याचे आदेश काढत बिगर शासकीय संस्थावर वचक निर्माण केला होता. एक लाखांहून अधिक संस्थेवर कार्यवाही करत काहीची नोंदणी सुद्धा रद्द केली होती. यामुळे धर्मादाय आयुक्त पदाचा दरारा वाढला होता.

Previous articleमहालक्ष्मी बाणगंगा मंदिर परिसराचा होणार कायापालट
Next articleआ. प्रविण दरेकर यांची गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास समितीवर “तज्ञ सदस्य” म्हणून नियुक्ती