ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या २१ डिसेंबरला मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, निधन,राजीनामा,अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी ७ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान २१ डिसेंबर रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३.00 पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी २ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

Previous articleअमरावती दंगल प्रकरणी शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल; मोदींवर साधला निशाणा
Next articleमुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या विरोधात कारवाई न करण्याचे आदेश