आ. प्रविण दरेकर यांची गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास समितीवर “तज्ञ सदस्य” म्हणून नियुक्ती

आ. प्रविण दरेकर यांची गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास समितीवर “तज्ञ सदस्य” म्हणून नियुक्ती

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासास चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिलेल्या सवलतीच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने विविध सवलतींचे प्रमाण व स्वरुप कसे असावे या बाबत शासनास शिफारशी करण्यासाठी ८ मार्च २०१९
च्या शासन निर्णयान्वये अप्पर मुख्य सचिव, गृहनिर्माण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून सदर उच्चस्तरीय समितीवर आ. प्रविण दरेकर यांची ‘ तज्ञ व्यक्ति ‘ म्हणून शासनाने आज नियुक्ती केली आहे.

आ. प्रविण दरेकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असून गृहनिर्माण सहकारी संस्थांनी बिल्डरकडे न जाता स्वयंपुनर्विकास करावा या करीता व्यापकअभियान उभे केले
त्या अनुषंगीक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज धोरण ही तयार केले त्या धोरणानुसार मुंबईत ४ ते ५ गृहनिर्माण संस्थांनी इमारती ही उभ्या करुन सभासदांना मोठ्या सदनिका उपलब्ध झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वयंपुनर्विकासास चालना मिळणे करीता अनेक सवलतीकरीता गृहनिर्माण संस्थांच्यावतीने आग्रही मागणी आ. प्रविण दरेकर यांनी केली होती. यानुसार मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण संस्थेतील सर्वसामान्य सभासदांसाठी कॅबिनेटच्या निर्णयाव्दारे अनेक सवलती देवून या योजनेला प्रोत्साहन दिले. दिलेल्या सवलतीलची अंमलबजावणी करण्सासाठी व नियमावली बनविण्यासाठी एक समिती गठीत केली. सदर समिती गृहनिर्माण विभागाचे अप्पर
मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली असून अप्पर मुख्य सचिव, महसुल, नगरविकास, सहकार हे सनदी अधिकारी सदस्य असून, सहकार, गृहनिर्माण व बँकीग याचा अनुभव असणारे विधान परिषदेचे सदस्य प्रविण दरेकर यांची या समितीवर ‘ तज्ञ व्यक्ति ‘ म्हणून नियुक्ती केली आहे.

दरेकर यांना स्वयंपुनर्विकासाचा सखोल अभ्यास असल्याने गेली अनेक वर्षे खडलेला मुंबईसह राज्यातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास वेगाने मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सहकार आणि गृहनिर्माण क्षेत्रातन त्यांचे अभिनंदन होत आहे.

Previous articleगेल्या सहा महिन्यांपासून धर्मादाय आयुक्त पद रिक्त
Next articleअखेर ठरलं… १४ जूनला  मंत्रिमंडळाचा विस्तार होणार