विधानसभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय बैठका

विधानसभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय बैठका

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हानिहाय बैठका घेण्याचे जाहीर केले आहे. १३ जूनपासून प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नुकताच स्थापना दिवस साजरा करण्यात आला असून, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हानिहाय बैठका घेण्याचे जाहीर केले आहे.१३ जून रोजी  मुंबई,  वसई, विरार, पालघर,  रत्नागिरी, पनवेल शहर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर,  ठाणे ग्रामीण, उल्हासनगर, भिवंडी आणि  नवी मुंबईतील पदाधिका-यांशी संवाद साधला जाणार आहे. १४ जून रोजी नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, मालेगाव, धुळे शहर, ग्रामीण, नंदुरबार, जळगाव शहर, ग्रामीण,  अहमदनगर शहर, ग्रामीण येथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.या बैठकांना खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार,खा. सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे आदी  नेते उपस्थित राहणार आहेत.या बैठकांना त्या त्या जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, नेते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Previous articleराजकीय सुडबुध्दीतून आपल्या विरूध्द तक्रारी – धनंजय मुंडे
Next articleआज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय