पावसाळी अधिवेशन….सत्ताधारी जोमात तर विरोधक कोमात

पावसाळी अधिवेशन….सत्ताधारी जोमात तर विरोधक कोमात

मुंबई नगरी टीम

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मिळालेले घवघवीत यश, विरोधकांच्या पदरात पडलेले अपयश आणि थेट विरोधी पक्ष नेत्याला फोडून त्यांना मंत्रिपदावर विराजमान केल्याने उद्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाची परिस्थिती सत्ताधारी जोमात तर विरोधक कोमात अशी असू शकते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात शिवसेना भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे आणि माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गळाला लावल्यामुळे सत्ताधा-यांचा विश्वास दुणावला आहे तर दुसरीकडे विरोधकांची परिस्थिती गोंधळलेली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करून सत्ताधा-यांनी विरोधकांची धार बोधट करण्याचा प्रयत्न उद्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर केला आहे.तरीही उद्यापासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अदिवेशनात राज्यातील दुष्काळ परिस्थिती,  मंत्र्यांचे भ्रष्टाचार, ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था,शिक्षणातील गोंधळ, आरक्षणाचे रखडलेले प्रश्‍न ,एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांच्यावर  गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे.राज्यावरचा कर्जाचा डोंगर आहे. राज्यातील एसएससी बोर्डात देण्यात येणारे २० गुण कमी करणे, सरसकट कर्जमाफी, बेरोजगारी, शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये देण्याच्या मागणीसह अनेक प्रश्नांवर विरोधी पक्ष  सरकारला धारेवर धरू शकतात.

Previous articleकेवळ सहा नव्हे तर  दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना वगळण्याची गरज
Next articleविरोधकांचा त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास राहिला नाही