चंद्रकांत पाटील मंत्रीपदाचा राजीनामा देणार ?

चंद्रकांत पाटील मंत्रीपदाचा राजीनामा देणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रीमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत  पाटील यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष म्हणून कऱण्यात आली असून, संघटनेनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी ते मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चंद्रकांत दादा हे उद्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल व सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती आहेत.

प्रदेश भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आल्याने तर मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून केल्याने या दोन्ही जागी नवीन अध्यक्षांच्या नियुक्त्या आज करण्यात आल्या आहेत.राज्यात पुढील तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले असल्याची चर्चा आहे.. पाटील यांची ओळख संघटनेचा आणि संघाचा माणूस म्हणून आहे,केंद्रिय अध्यक्ष अमीत शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. चंद्रकांत दादा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ संघटनेचे काम हाती घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल व सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती आहेत. ते फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जातात. शिवसेनेबरोबरची युती घडवण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या गुप्त व उघड वाटाघाटींचा मोठा वाटा आहे.

Previous articleशहीद जवानाच्या कुटुंबीयांना मिळणार २५ लाखांऐवजी एक कोटींची मदत
Next articleतब्बल २६ सनदी अधिका-यांच्या बदल्या