युतीमध्ये जे ठरलंय ते लेखी द्यावं :संजय राऊत

युतीमध्ये जे ठरलंय ते लेखी द्यावं : संजय राऊत

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेसाठी शिवसेनेने तयार व्हावे या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते खासदार संजय प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाची ही भूमिका समंजसपणाची असून,युतीमध्ये जे ठरले आहे ते त्यांनी लेखी स्वरूपात द्यावे त्यानंतरच शिवसेना भाजपात चर्चेला सुरूवात होईल असे राऊतांनी म्हटले आहे.त्यामुळे गेली बारा दिवस या दोन्ही पक्षात असलेला चर्चेचा गुंता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बारा दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर आज मुंबईत झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेना भाजपातील प्राथमिक चर्चेचा श्रीगणेशा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजपाच्या या भूमिकेवर शिवसेनेने पुन्हा ताठर भूमिका घेतली आहे.मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत भाजपाने प्रथम युतीमध्ये जे ठरले आहे ते लेखी स्वरूपात द्यावे अशी मागणी केली आहे.भाजपाने आज चर्चेची तयारी दर्शवली आहे. भाजपाने ही भूमिका अगोदरच घेतली असती तर सध्या निर्माण झालेला तिढा वाढला नसता आणि राज्यात सरकार स्थापन झाले असते असे राऊत म्हणाले.शिवसेनेने भाजपाला कोणताही प्रस्ताव दिला नव्हता हे म्हणणे चुकीचे आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे ठरले होते तोच आमचा प्रस्ताव असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला शिवेसना जबाबदार नसून, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल असा दावाही त्यांनी केला.

Previous articleशिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारं २४ तास खुली
Next articleशेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढा