मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू  

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बंद करण्यात आल्यानंतर शिवसेना उपनेते उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी हा कक्ष सुरू करण्याची मागणी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे केली होती. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत देखील चालू ठेवण्यासाठी सावधी पदे  निर्माण करुन त्या पदांवर सध्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता दिली असून, सामान्य प्रशासन विभागाने तसा शासन निर्णय आज जारी केला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बंद करण्यात आला होता. यामुळे  राज्यातील गरजू रूग्ण हवालदिल झाले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद असल्याने मोठ्या अपेक्षेने मंत्रालयात येणा-या गरीब रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोकळ्या हाताने परत जावे लागत असल्याने मोठी नाराजी पसरली होती.त्यासंदर्भात शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष त्वरीत सुर करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत देखील चालू ठेवण्यासाठी सावधी पदे  निर्माण करुन त्या पदांवर सध्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता दिली असून, सामान्य प्रशासन विभागाने तसा शासन निर्णय आज जारी केला आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आला. मुख्यमंत्री सहायता कक्षासाठी नियुक्त करण्यात आलेले ३ अधिकारी या कक्षात रुजूही झाले आहेत. लेखा व कोषागारे संचालनालयातील १ सहायक संचालक व २ सहायक लेखा अधिकारी यांची नियुक्ती सध्या करण्यात आली आहे.

Previous articleअवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी  आर्थिक मदतीची घोषणा
Next articleसत्ता गेल्यानंतर भाजपा आक्रमक ; राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन