विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले विरुद्ध किसन कथोरे

विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले विरुद्ध किसन कथोरे

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उद्या रविवारी होत असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे सरकारची पुन्हा परीक्षा होणार आहे , या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसने नाना पटोले  यांना उमेदवारी दिली असून, भाजप आणि मित्रपक्षाने किसान कथोरे यांना या निवडणुकीसाठी रिंगणात उतरविले आहे . दरम्यान या निवडणुकीतील फोडाफोडीचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विश्वासदर्शक ठरावाप्रमाणे खुले मतदान घेण्याची व्युहरचना आखली जात असल्याची चर्चा आहे .

ठाकरे सरकारने आपल्यावरील विश्वासदर्शक ठराव आज १६९ विरुद्ध शून्य मताने जिंकला या ठरावानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीला ठाकरे सरकारला सामोरे जावे लागणार आहे अध्यक्षपदाची निवडणूक हि निवडणूक गुप्त पद्धतीने होत असल्याने भाजपकडून काही दगाफटका होऊ नये याची सरकारकडून काळजी घेतली जात आहे . विधानसभेत शिवसेना ५६,राष्ट्रवादी-५४,काँग्रेस -४४,बहुजन विकास आघाडी-३,प्रहार जनशक्ती पार्टी-२समाजवादी पार्टी-२क्रांतिकारी शेतकरी संघटना -१ व अपक्ष ६ असे महाराष्ट्र विकास आघाडीचे एकूण १७० आमदारांचे  पक्षीय बलाबल  आहे . तर विरोधकांकडे भाजप- १०५,जनसुराज्य शक्ती-१ राष्ट्रीय समाज पक्ष-१,व अपक्ष-७ असे एकूण ११४ आमदारांचे बलाबल आहे,  सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आज एमआयएमच्या २ ,कम्युनिस्ट पक्षाच्या १ व मनसेच्या एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली होती . आता उद्या रविवारी सकाळी ११ ते १ या वेळेत ही  निवडणूक होऊन २ वाजता मतदानाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे .

Previous articleजो दैवताला मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही : मुख्यमंत्री
Next articleफडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन….वाट पहा !