एकनाथ खडसे शरद पवार यांच्या भेटीमुळे खळबळ

एकनाथ खडसे शरद पवार यांच्या भेटीमुळे खळबळ

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून, सुमारे अर्धा तास चर्चा केल्याने अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहे.दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपुढे नाराजी व्यक्त करण्यासाठी पोहचलेल्या खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये नेमकी कार्य चर्चा झाली ते समजू शकलेले नसले तरी भाजपात नाराज असलेले खडसे पवार यांची भेट घेवून चर्चा केल्याने अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात आहेत. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. खडसे यांनी वेळोवेळी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. जळगाव मध्ये झालेल्या भाजपाच्या बैठकीतही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर त्यांनी आज दिल्लीत पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची या नेत्यांशी भेट होवू शकली नाही.त्यानंतर त्यांनी अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

मला जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना तरीही मी त्यांची आरती करावी काय असा सवाल खडसे यांनी करून माझा पक्ष सोडण्याचा कसलाही विचार नाही. मात्र हे असेल सुरू राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला होता.आज खडसे यांनी पवारांची भेट घेतल्याने भाजपबरोबरच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराज असलेले खडसे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याने खडसे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleमला उपमुख्यमंत्री करावं हि कार्यकर्त्यांची इच्छा : अजित पवार
Next articleराज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे