आदित्य ठाकरेंच्या “नाईटलाईफ”संकल्पनेला भाजपचा विरोध

आदित्य ठाकरेंच्या “नाईटलाईफ”संकल्पनेला भाजपचा विरोध

मुंबई नगरी टीम

मुंबई : आदित्य ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या नाईटलाईफ हि संकल्पना मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे.मात्र ठाकरे यांच्या नाईट लाईफला भाजपने विरोध केला आहे.निवासी भागातील हाँटेल,पब सुरु ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असेल तर आमचा त्याला कडाडून विरोध असेल असा स्पष्ट इशारा भाजपने दिला आहे.

नाईटलाईफ संदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत प्रायोगित तत्त्वावर नाईटलाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. मुंबईमध्ये बीकेसी,नरिमन पॉईंट, काळाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर २४ तास खुले राहणार आहे.हे सर्व सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येत आहे.राज्य सरकार जर निवासी भागातील हाँटेल, पब सुरु ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असेल तर आमचा त्याला कडाडून विरोध असेल, असे आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.मुंबईत दुकाने, माँल, हाँटेल, पब २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याबाबत भूमिका मांडताना शेलार यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, मुंबईत हाँटेल, बार, पब २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हाँटेल,पब २४ तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहिल.कायदा आणि सुव्यवस्थेसह स्थानिक नागरिकांची सुरक्षितता याचा विचार होणे अपेक्षित असून या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार असून या निर्णयामुळे असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

Previous articleसंजय राऊतांचे विधान ही शिवसेनेची भूमिका आहे का ? : अशोक चव्हाण
Next articleअण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारके उभारणार