नवाब मलिक आणि संजय कुटे यांच्यात खडाजंगी

नवाब मलिक आणि संजय कुटे यांच्यात खडाजंगी

मुंबई नगरी टीम 

नागपूर : आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान भाजपचे आमदार संजय कुठे व राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.कुटे यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली असता माझा राजीनामा मागणारे तुम्ही कोण असा सवाल करताना तुम्हाला जेलमध्ये पाठवायचे आहे,. कोणत्या जेलमध्ये पाठवायचे ते आम्ही ठरवू असा हल्ला मलिक यांनी केल्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला या दरम्यान मलिक यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात आल्यानंतर पुढील कामकाज सुरु झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर विधानसभेत महसूल,वनविभाग कृषी पदुम नगरविकास व ग्रामविकासाच्या पुरवणी मागण्यांवरीळ चर्चा  पुकारण्यात आली.या चर्चेत भाग घेताना भाजप आमदार व माजी मंत्री डॉ. संजय कुटे हे अधिक वेळ घेत असल्याचे पाहून राष्ट्रवादी सदस्य नवाब मलिक यांनी त्यावर आक्षेप घेतला. यावर हे मध्ये मध्ये कसे काय बोलतात यांनी राजीनामा दिला पाहिजे असे वक्तव्य कुटे यांनी केले.यावर मलिक संतप्त झाले,मला जनतेने निवडून दिले आहे.मला राजीनामा मागण्याचा अधिकार यांना नाही.तुमच्या लोकांना जेलमध्ये पाठवायचे आहे कोणत्या जेलमध्ये पाठवायचे ते आम्ही ठरवू असे उद्गार मलिक यांनी काढल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकच गदारोळ केला.यावेळी मलिक आणि कुटे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

भाजप सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत मलिक यांचा निषेध केला तर सुधीर मुनगंटीवार यांनी मलिक यांच्यावर आक्षेप घेत या सदनातील सर्व सदस्य सन्माननीय आहेत.एखाद्या सदस्याविषयी बोलताना जपून शब्द वापरावे तसेच मलिक यांचे आक्षेपार्ह वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी पिठासीन अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी मलिक यांचे वादग्रस्त वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश दिल्यानंतर पुढील कामकाज सुरु झाले

Previous articleआयुष्यभर भाजपाची पालखी वाहणार नाही : उद्धव ठाकरे
Next articleशेतक-यांना सरसकट कर्जमाफी देणारच : अजित पवार