जेएनयू सारखे हल्ले महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही

जेएनयू सारखे हल्ले महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काल झालेला हिंसाचार पाहून मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याचे सांगतानाच जेएनयू सारखे हल्ले महाराष्ट्रात सहन केले जाणार ही नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.तोंड झाकून हल्ला करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे,हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.या हिंसाचाराचे कधीच समर्थन होऊ शकत नाही.हा हिंसाचार पाहून मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याचे ते म्हणाले.हल्लेखोरांनी तोंडावर कपडा लावून हल्ला केला याचाच अर्थ हे बुरखाधारी डरपोक होते.या हल्लेखोरांचा शोध घेवून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.युवक हे आपले उद्याचे आधारस्तंभ आहेत.त्यांची विचारधारा ही महत्त्वाची आहे.युवक आपल्या वसतिगृहात सुरक्षित नसतील हे देशाला कलंक असल्यासारखे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.राज्यातील विद्यार्थी हे सुरक्षित आहेत.त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही,जर काही झाले तर आम्ही माफ करणार नाही असे

सांगतानाच अशी कोणतीही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
हल्लेखोरांचा चेहरा देशासमोर यायला पाहिजे असे सांगतानाच.यामध्ये मला राजकारण करायचे नाही. या प्रकरणाची निःपक्ष पणाने याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे राजकारण नको असेही ते म्हणाले.काही जण भातुकलीचा खेळ खेळत आहेत त्यांना खेळू दे असा टोला त्यांनी माजी मंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना लगावला.राज्यातील सरकार गुढी पाडव्याला पडेल असे वक्तव्य त्यांनी केले होते त्याचा समाचार त्यांनी घेतला.

Previous articleराज्याला आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्योगपतींशी चर्चा करणार
Next articleसत्तापिपासू भाजपा आता रक्तपिपासू झाली आहे : बाळासाहेब थोरात