लॅटव्हियात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले मंत्री उदय सामंत

मुंबई नगरी टीम 

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वी सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आता युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा येथील विमानतळावर अडकलेल्या भारतातील ३७ विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत.त्यांना मायदेशी परतण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क करतानाच पंतप्रधान कार्यालय,विदेश मंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे सातत्याने मंत्री सामंत यांनी  प्रयत्न सुरू ठेवले आहेत.विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये,शासन आपल्याला मदत करेल असा विश्वासही या विध्यार्थ्यांना  सामंत यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातील विमानसेवा बंद करण्यात आली आहे.युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील ३७ विद्यार्थी अडकले आहेत.त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते केंद्र शासनाच्या सतत संपर्कात आहेत.शिवाय पंतप्रधान कार्यालय,विदेश मंत्रालय,मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा त्यांनी सुरू ठेवला आहे.गेल्याच आठवड्यात  सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात यशस्वी ठरलेले मंत्री सामंत यांनी या विद्यार्थ्यांना भारतात परत आणणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.रीगा येथे अडकलेल्या  विद्यार्थ्यांना तिथे कोणत्याही स्वरूपाची मदत अथवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने त्या विद्यार्थ्यांनी भीतीपोटी मंत्री सामंत यांच्याशी साधला .

या विद्यार्थ्यांशी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यानी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यावेळी सामंत यांनी त्यांना धीर देत त्यांना भारतात परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.या भारतीय ३७ विद्यार्थ्यामध्ये महाराष्ट्रातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये,शासन आपल्याला मदत करेल असा विश्वासही या विध्यार्थ्यांना  सामंत यांनी दिला.

Previous articleराज्यात चिकन,मटण, मासे आणि फळविक्रीला परवानगी
Next articleमत्स्य व्यावसायिकांना दिलासा; आता मासे वाहतूक करता येणार