धक्कादायक : राज्यातील एका मंत्र्याला  कोरोनाची लागण ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले जात आहे.काही दिवसांपूर्वी या मंत्र्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती.या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.मात्र त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांना ठाण्यातील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.काल रात्री त्यांना पुढील उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हालावण्यात आले आहे.

ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे या मंत्र्यांने काही दिवसांपूर्वी  आपली कोरोना चाचणी  केली होती.त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या मंत्र्यांने स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले होते.त्यांना असणारा ताप अचानक बळावल्याने त्यांना ठाण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.धक्कादायक म्हणजे या मंत्र्याने दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात एका बैठकीला हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे.काल मध्यरात्री त्यांचा ताप अधिकच बळावल्याने त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून,आज त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.या मंत्र्याने मंत्रालयात बैठकीला हजेरी लावल्याने त्यांना भेटलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा आहे.

Previous articleकामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही
Next articleखूशखबर :  शासकीय कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार मिळणार