राहुल गांधींच्या एका फोनमुळे महाविकास आघाडीला मिळाले बळ

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन आम्ही सरकारसोबत असल्याच आश्वासन दिल्याने राज्यात सुरू असलेले अनिश्चितेचे मळभ दुर झाले आहे.

काल दिवसभर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या चर्चा होत्या त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर जावून भेट घेतल्याने या चर्चांना जोर मिळाला होता.त्यातच काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात काँग्रेसचा महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा आणि मात्र आम्ही मुख्य धोरणकर्ते नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. या घडोमोडीमुळे राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली होती.या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करुन आम्ही सरकारसोबत असल्याचे आश्वासन दिले या दोन नेत्यांमध्ये यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली असल्याचे समजते

गांधी यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र आज गांधी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याने काँग्रेस-शिवसेनेचे नेते एकमेकांशी संवाद साधत असल्याचे दाखवून महाविकास आघाडी सरकारमध्ये संभ्रमाचे वातावरण नाही. तीनही पक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत,हे दाखवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला गेला आहे.मुख्यमंत्री ठाकरे हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेहमी संपर्कात असतात मात्र  आता राहुल गांधी यांनी  मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.कोरोनाच्या संकटात राज्यावर अस्थिरचे निर्माण झालेले मळभ गांधी यांच्यामुळे दुर झाल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.

Previous articleमाजी मुख्यमंत्र्यांनी दिले दुस-या माजी मुख्यमंत्र्यांना आव्हान !
Next articleमहाराष्ट्राची फजिती व्हावी,तारांबळ उडावी म्हणून पियुष गोयल यांनी रेल्वे गाड्या पाठविल्या