धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; आज मिळाला डिस्चार्ज   

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे.गेली अकरा दिवसांपासून त्यांच्यावर येथील आज ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना आज  डिस्चार्ज देण्यात आला असून, डिस्चार्ज नंतर ते परळीला रवाना झाले आहेत.

राज्य मंत्रिमंडळातील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केली आहे.मंत्रालयात कामकाजानिमित्त आल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

मुंडे यांच्यासोबत करोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे.आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे,आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि प्राथनेमुळे माझी ही दुसरी चाचणी निगेटिव्ह आली असून डिस्चार्ज मिळाल्यामुळे मी मुंबईवरून गावी जात आहे असे मुंडे यांनी सांगितले.

Previous articleराज्य सरकारने चीनच्या कंपन्यांसोबत केलेले करार जैसे थे !
Next articleशाळांना अनुदान वाटपाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार