अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या !

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी यामध्ये उडी घेतली आहे. सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा करतानाच या  प्रकरणात राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे असा खळबजनक आरोप त्यांनी केला.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी कोरोना, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आदी मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले.सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाली मात्र मुंबई पोलिसांनी अजुन एफआयआर दाखल केलेली नाहीये. या प्रकरणावर जाणूनबुजून दुर्लेक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे अशी टीका त्यांनी केली.सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी का केली नाही असा प्रश्न उपस्थित करीत,दिशा सालियनने आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या केली असल्याचा दावा राणे यांनी केला. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास करायला हवा होता असेही राणे म्हणाले.

सुशांतसिंह राजपुतच्या घराजवळ असलेल्या एका बंगल्यात रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 13 तारखेला ते तिथे जमले आणि सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर त्यांच्या गाडीचा ताफा कॅमेऱ्यात  येणार नाही.असे सांगून ते कोण आहेत हे सर्वांना माहित असल्याचे राणे यांनी सांगितले. ज्याअर्थी सरकार आणि पोलिसांवर एवढा दबाव येतोय त्या अर्थी पोलीस अधिकारी कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहेत अशा आरोपही त्यांनी केला.राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेगणिक वाढतच चालली आहे.मृत्यूदराचे टक्केवारीही कमी होत नाही.तरी राज्याचे मुख्यमंत्री हे घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्य कारभार सांभाळतायेत. सामना मुखपत्रातून मुलाखत देताना कोरोना परिस्थितीचा उल्लेख करत नाहीत.या मुलाखतीतून ते आपले अज्ञान जनतेला दाखवून देतात.मुख्यमंत्री घरातच बसून राहिल्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचाच दबाव नाही. या साऱ्या गोष्टीमुळे आपले राज्य सर्वच क्षेत्रात पिछाडीवर जात आहे अशी टीका राणे मुख्यमंत्र्यांवर केली.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्विट मध्ये काहिही चुकीचे नाही तेव्हा त्यावर कोणाला टीका करण्याचाही अधिकार नाही असेही खा. राणे म्हणाले.

Previous articleदुकाने आणि कार्यालयाचे फलक मराठीत नसतील तर होणार कारवाई
Next articleहे तर गलिच्छ राजकारण ; पण मी संयम बाळगलाय!