…असे करताना भाजपला शरम वाटली पाहिजे होती !

मुंबई नगरी टीम

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला देशातील एकूण ९२६ पोलीस कर्मचा-यांना पदके प्रदान करण्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आली. यावेळी ९२६ पदकांपैकी ५८ पदके ही महाराष्ट्र पोलिसांना मिळाली आहे. या मुद्द्यावरूनच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाण साधला आहे.

“देशातील एकूण ९२६ पोलीस पदकांपैकी महाराष्ट्राच्या पोलिसांना ५८ पदके म्हणजे एकूण ४६ टक्के पदके मिळाली. ते पण मोदी सरकारकडून! भाजपच्या नेत्यांना बिहार पोलिसांशी तुलना करून महाराष्ट्राची बदनामी करताना शरंम वाटली पाहिजे होती”, असा घणाघात सचिन सावंत यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर केला आहे.

गेल्या महिनाभरापासून अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून याचा तपास सुरू असताना बिहार पोलिसांनी देखील यात दखल दिली. केवळ इतकच नव्हे तर मुंबईत येऊन याचा तपास देखील सुरू केला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासहर्तेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. तर हे प्रकरण आता सर्वाेच्च न्यायालयात देखील पोहचले असून याचा तपास कोणाकडे द्यायचा यावर सुनावणी सुरू आहे. अशातच भाजप सरकारकडून देखील या प्रकरणाला हवा दिली जात आहे. तर काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत प्रकरणावर ट्विट करत मुंबईत सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले होते. अमृता फडणवीस यांच्यावर सर्वत्र टीकस्त्र होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यावर सारवासारव करत स्पष्टीकरण दिले. परंतु असे असले तरी राज्यातील पोलिसांवर असा अविश्वास दाखवणे चुकीचे असल्याचे मत महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. याच मुद्द्यावरुन सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना सुणावले आहे.

Previous articleही लढाई सुध्दा आपण नक्कीच जिंकू : आदित्य ठाकरे
Next articleशेतकऱ्यांना कर्जाच्या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देणार