नाव रामाचं घ्यायचं कृती मात्र नथुरामाची करायची ;जयंत पाटलांचे भाजपावर टीकास्त्र

मुंबई  नगरी टीम

मुंबई : महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची… रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली आहे असा जोरदार टोला लगावतानाच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.

हाथरसमधील पीडीत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे असेही  पाटील म्हणाले.भाजपाने ज्यापध्दतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleयेत्या ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार
Next articleराज्यातील सिनेमागृहे,नाट्यगृहे लवकरच सुरु होणार