राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई नगरी टीम

मुंबई : देशात येत्या १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली असली तरी राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता याबाबत दिवाळीनंतर निर्णय घ्यावा,अशी चर्चा काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा येत्या १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही त्यांनी जारी केल्या आहेत.त्यामुळे राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार या कडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असतानाच राज्यातील सध्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील शाळा  येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरु नसल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या शाळा सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा,अशी चर्चा काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. राज्यात सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरु आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शालेय शिक्षण विभागाला दिले.त्यामुळे तुर्तास शाळा या दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.राज्य शासनाकडून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे.दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरु होण्याबाबत विचार होऊ शकतो, तसेच सध्याच्या परिस्थितीत ९ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे असल्याचे सांगण्यात येते.

Previous articleशरद पवारांची भेट घेण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही
Next articleसर्वसामान्यांना दिलासा : आता मास्क मिळणार अवघ्या तीन ते चार रुपयांना