शरद पवारांची भेट घेण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत काल दिवसभर चर्चा होती.मात्र शरद पवार यांच्या भेटीबाबत नियोजन नसल्याचे खडसे यांनी सांगून,मला वाटेल तेव्हा शरद पवार यांची भेट घेईल,त्यांच्या भेटीसाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाराज भाजपचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात स्थानिक नेत्यांशी चर्चा करून चाचपणी केली आहे.या पार्श्वभूमीवर खडसे आणि पवार यांच्या भेटीबाबत काल दिवसभर चर्चा सुरू होती.तर या भेटीबाबत शरद पवार यांनीही नियोजन नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर खडसे यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पवार आणि आपली भेट झाली नाही मात्रमला ज्यावेळेस वाटेल तेव्हा त्यांना भेटेन,या भेटीसाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही असे खडसे यांनी सांगितले आहे.

एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री एकनाथ खडसे पक्षाकडून अन्यायकारण वागणूक दिली जात असल्यामुळे नाराज आहेत.त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीत डावलल्याने त्यांनी उघडपणे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांना स्थान न देण्यात आल्याने ते लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.आपल्याला पक्षाकडून अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेतृत्वावर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर खडसे यांना येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यास त्यांचा पक्षाला फायदाच होण्यार असल्याचे स्थानिक नेत्यांनी मत व्यक्त केल्याने खडसेंच्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादी पक्षांत हालचालींना वेग आला आहे.

Previous articleमायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप लावा अन्यथा मनसैनिक कारवाई करतील
Next articleराज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत