ओबीसी आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार 

मुंबई नगरी टीम

मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षण संबंधित विविध मागण्या मान्य होण्यासाठी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक आयोजित करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पावले उचलण्यात यावी अशी याचना चर्चेच्या माध्यमातून केली आहे.या मागणीला दुजोरा देत ओबीसी चा बॅकलॉक तातडीने भरण्याबाबत शासन  सकारात्मक असून  त्यासाठी एक समीती नेमणूक करण्याच्या शासनाच्या विचारधीन असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले तसेच ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले असल्याची माहिती  विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे.

ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक झाली. बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार,परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि  ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous article‘आम्ही पण तुमचे बाप आहोत’, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा 
Next articleदेशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा क्राईम रेट कमी : गृहमंत्री अनिल देशमुख