नाराजीचा सूर उमटताच मुख्यमंत्री अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणी दौ-यावर

मुंबई नगरी टीम

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून,शेतक-याच्या हाताशी आलेले पिक गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकार फिरकत नसल्याने गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमातून नाराजीचा सूर उमटल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामथांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी येत्या सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे.या पावसाने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेल्याने बळीराजा हताश झाला असून,या संकटात सरकारकडून काही मदत मिळेल या आशेवर आहे.परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या काही चित्रफित समाज माध्यमातून न्हायरल होत आहे.मुख्यमंत्री आता तरी घरातून बाहेर पडा अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात येवू लागली होती.तर या संकटात शेतक-यांना मदत करण्यासाठी मातोश्री बाहेर पडा अन्यथा ठाकरे नावावरील लोकांचा विश्वास असे मत मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी व्यक्त केले होते.दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे घराबाहेर पडत नसल्यानचे टीकास्त्र भाजप नेत्यांनी सोडले होते.

केंद्र किंवा राज्य सरकारकडून अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून दोन दिवसांचा मराठवाडा दौरा करणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत असल्याने राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ठाकरे हे संकटात कुठेच नसल्याचे चित्र दिसत नसल्याचे चित्र विरोधकांकडून निर्माण केले जात असतानाच अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौरा करण्याता निर्णय घेतला आहे.त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे हे येत्या सोमवारी सोलापूरच्या दौ-यावर जाणार आहेत.सोमवारी ते सकाळी विमानाने सोलापूरसा पोहचणार आहेत.त्यानंतर ते  सांगवी खूर्द येथील नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

या पाहणी दौ-यात ते सांगवी येथील बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाची पाहणी करून रामपूर मध्ये अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.बोरी उमरगे या भागातील आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करून ते सोलापूरमध्ये पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतक-यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या दौ-यामुळे अतोनात नुकसान झालेला बळीराजाच्या नजरा आता सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत.

Previous articleठाकरे सरकारचा दिलासा : दसऱ्यापासून राज्यातील जिम,व्यायामशाळा सुरु होणार
Next articleनायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल : गृहमंत्री देशमुख