एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेही भाजपला सोडचिठ्ठी देणार ? सूनबाईंच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई नगरी टीम

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. अशातच एकनाथ खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर देखील पक्षांतर कण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपच्या तिकिटावर खासदार झालेल्या सुनबाई रक्षा खडसे या काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान,शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे पक्षप्रवेश करणार अशी चर्चा होती.

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खेवलकर व खडसेंच्या संपर्कातील दहा ते पंधरा आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.एकनाथ खडसे यांना डावलून भाजपने त्यांच्या मुलीला तिकीट दिले होते.मात्र एकनाथ खडसे यांची पक्षात होणारी घुसमट पाहता आता दोन्ही बाप लेक राष्ट्रवादीत जाऊन भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

एकनाथ खडसे यांची सून राक्षा खडसे या रावेरच्या खासदार आहेत. भाजपकडून त्यांना महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता रक्षा खडसे यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणून अनेक वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. यामध्ये एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त देखील देण्यात आला होता. त्यामुळे मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते, त्यामुळे ते चुकले. योग्य वेळ येईल, वाट पाहा, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Previous articleसध्या अडचणीचे दिवस आहेत,धीर सोडायचा नाही.. सरकार तुमचं आहे : शरद पवार
Next articleकेवळ काही तरी घोषणा करणार नाही; तर प्रत्यक्ष मदत करणार : मुख्यमंत्री