बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दिलेला विचार बळकट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावे

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमृखांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींनी वंदन केले.

माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात शिवसेना,भारतीय विद्यार्थी सेनेपासून झाली.त्यामुळे वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा आणि संस्कारांचा पगडा आजही आपल्यावर आहे. राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना निश्चितच त्यांच्या त्या जडणघडणीचा मला उपयोग होत आहे. वरून कठोर दिसणारे वंदनीय बाळासाहेब मृदू आणि प्रेमळ स्वभावाचे होते. आज त्यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना नमन करताना जुन्या स्मृती व अनेक प्रसंग डोळ्यासमोरून गेले अशी प्रतिक्रिया यावेळी प्रविण दरेकर यांनी दिली.

वंदनीय बाळासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण हे आपले परम कर्तव्य आहे.आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे सामाजिक बांधिलकीचे काम आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दिलेला विचार बळकट व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावे अशी अपेक्षाही प्रविण दरेकर यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Previous articleलोकं गायी म्हशीचा आवाज सहन करतील पण..; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर टीका
Next articleअटलजी आणि मोदींच्या जीवावर पदे उपभोगणारे आता इतरांना शिकवतायत