शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना दिलेली स्थगिती उठविणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यावर २०१८ मध्ये स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठविणार असल्याची माहिती अन्न,नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नविन अधिकृत स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याबाबत धोरण, राज्यातील रद्द केलेली स्वस्त धान्य दुकान, शहरी भागात नविन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आदि विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी भुजबळ बोलत होते.शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आता उठविण्यात येणार आहे. संपूर्ण शहर आणि लगतची उपनगरे यांचा विचार करुन शहरातील रास्त भाव धान्य दुकानांची स्थळ निश्चिती करण्यासाठी आराखडा तयार करावा. या आराखड्यावर प्रचलित दुकाने, बंद असलेली दुकाने, प्रस्तावित दुकाने अशी सर्व दुकाने प्रथम एकांकासह नोंदवावी, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.ग्रामीण भागात महसुली गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन स्वस्त धान्य दुकाने मंजूर करणे तसेच रद्द करण्यात आललेल्या दुकांनासाठी जाहीरनामे काढण्यात यावेत, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

Previous articleसरकार दारूवाल्यांवर मेहरबान का ? हाच तुमचा किमान समान कार्यक्रम
Next articleआधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या; राष्ट्रवादीचे खोतांना प्रत्युत्तर