अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ नाना पटोलेंच्या गळ्यात, कार्यकारी अध्यक्षही जाहीर

मुंबई नगरी टीम

मुंबई : अखेर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कालच नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.तर लगेच आजच त्यांच्या गळयात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली. गेल्या महिनाभरापासून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी समोर आली होती. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क काढले जात होते. अखेर आज नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यासह कार्यकारी अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

नाना पटोले हे ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी अशाच आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडने नाना पटोल यांच्या नावाला सहमती दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला अधिक बळ देण्याची जबाबदारी ही नाना पटोले यांच्यावर असणार आहे. तसेच नाना पटोले यांच्या दिमतीला ६ कार्यकारी अध्यक्ष देखील नियुक्त करण्यात आले आहे. सोबतच प्रदेश उपाध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष

१. शिवाजी मोघे (यवतमाळ)
२. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
३. नसीम खान (मुंबई)
४. कुणाल पाटील (धुळे)
५. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
६. प्रणिती शिंदे (सोलापूर)

काँग्रेसचे १० नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष

१. शिरीष चौधरी (जळगाव)
२. रमेश बागवे (पुणे)
३. हुसैन दलवाई (मुंबई)
४. मोहन जोशी (पुणे)
५. रणजीत कांबळे (वर्धा)
६. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
७. बी. आय. नगराळे
८. शरद अहेर (नाशिक)
९. एम. एम. शेख (औरंगाबाद)
१०. माणिकराव जगताप (रायगड)

Previous articleयेत्या १५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार
Next articleअन् धनंजय मुंडेंनी ‘त्या’ कार्यकर्त्याचा पूर्ण केला पण !