मनसे सोबत युती करणार नाही ; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपच्या अनेक नेत्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्याने आगामी मुंबई महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत भाजप,मनसे युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.अन्य भाषिकांसोबत अन्याय करण्याचा मनसेचा विचार आहे, त्यासोबत भाजप कधीच सहमत होवू शकत नसल्याने मनसे सोबत कोणत्याही प्रकारे युती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे फडणवीस यांनी सांगून मनसे सोबत युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

फडणवीस म्हणाले की,मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला म्हणून त्यांच्यासोबत भाजपने युती करण्याची जी चर्चा होत आहे त्यात तथ्य नाही.भाजपची कोणत्याही स्थरावर अशा प्रकारे युती करण्याची चर्चा सुरू नाही. मराठीच्या मुद्यावर भाजप मनसेच्या मुद्याशी सहमत आहे. स्थानिक लोकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे मात्र त्या साठी अन्य भाषिकांसोबत अन्याय करण्याचा मनसेचा विचार आहे, त्यासोबत भाजप कधीच सहमत होवू शकत नसल्याने मनसे सोबत कोणत्याही प्रकारे युती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे ते म्हणाले.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद आता रिक्त झाले आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबाबत चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. साधारणतः महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष हा एकमताने निवडतो.मात्र हे सरकार विरोधी पक्षांशी संवाद साधता नाही.त्यामुळे मित्रपक्ष बसून यावर निर्णय घेऊ.पण विधानसभा अध्यक्षपदावरून सरकार घाबरलेले आहे हे पाहून आंनद होत आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही, अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पात राज्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची सविस्तरपणे माहिती दिली. यासह त्यांनी अन्य मुद्द्यांवरही भाष्य केले. विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले असून भाजपची भूमिका काय? यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, साधारणतः महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष आम्ही एकमताने निवडतो. निवडणूक होत नाही. मात्र हे सरकार विरोधी पक्षाशी संवाद करत नाही. विरोधी पक्षाच्या अधिकारांचेही हनन होते. त्यामुळे आम्ही आमच्या सर्व मित्रपक्षांसोबत बसून यावर निर्णय घेऊ. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरून सरकार खूप घाबरलेले पाहून आंनद होत आहे, असे फडणवीस म्हणाले.पुण्यातील एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीच्या अटकेविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला. “शरजीलला अटक केली जात नाही, पण त्याला अटक का केले नाही म्हणून भाजपाच्या उत्तर भारतीय आघाडीने आंदोलन केले. त्या पदाधिकाऱ्यांना घरात जाऊन ताब्यात घेतले गेले. हेच सगळ्यात मोठे आश्चर्य आहे. त्यामुळे हे शरजीलचे सरकार आहे. त्याला संरक्षण देणारे सरकार आहे, असे आम्ही म्हणालो तर चुकले काय?,” असा सवाल फडणवीस यांनी केला.

सेलिब्रिटींचा प्रश्न आहे, तर ज्यांनी चौकशीची मागणी केली आणि ज्यांनी मागणी मंजूर केली त्या दोघांचेही मानसिक संतुलन बरोबर नाही, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. चौकशी तर त्यांच्या मानसिक संतुलनाची व्हायला हवी. भारताच्या सार्वभौमत्वाशी छेडछेड सहन केली जाणार नाही,असे ट्विट आहे.यावर काय चौकशी होणार ? भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही, अस म्हणणे चुकीचे असेल तर आपल्या सगळ्यांना सरकारने अटक करावे, असेही फडणवीस म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाबाबत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाकडून सहमतीने अध्यक्षांची निवड करण्याची प्रथा आणि परंपरा राहिली आहे मात्र सध्याच्या सरकारचा विरोधकांबाबत असलेला विसंवाद पाहता मित्रपक्षांशी चर्चा करून आम्ही अध्यक्षपदाबाबत निर्णय घेवू असे फडणवीस म्हणाले.१२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवृत्तीवर राज्यपाल योग्य त्या पध्दतीने निर्णय घेत आहेत,त्यात सरकारमधील मंत्र्यांनी वक्तव्ये करणे योग्य नाही,असे सांगून फडणवीस म्हणाले की,राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत,त्यांच्यावतीने मंत्रिमंडळ राज्यात कार्यरत असते मात्र त्यांच्याबद्दलच जर मंत्री काही वक्तव्ये करत असतील तर ते कोणत्या नियमात बसते याचा त्यांनीच विचार करायला हवा असे फडणवीस म्हणाले.

Previous article‘जस्ट वेट अँण्ड वॉच’…खा.उदयनराजे भोसले आणि नाना पटोलेंच्या भेटीवर चर्चा
Next articleउर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेतील अडसर दूर;मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा