मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात दररोज कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.गेली दोन दिवस १० हजाराचा असणारा रूग्णांचा आकडा आज ११ हजार १४१ वर पोहचला आहे.तर आज राज्यात ३८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के एवढा आहे.
गेली काही दिवस राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.गेली दोन दिवस १० हजारापर्यंत असणारा रूग्णांचा आकडा आज वाढला असून,आज राज्यात ११,१४१ नवीन रुग्णांची भर पडली आहे.तर आज दिवसभरात ३८ कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के एवढा आहे. आज ६ हजार १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले,राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ६८ हजार ४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के एवढे झाले आहे.सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज एकूण ९७ हजार ९८३ एवढे अॅक्टीव्ह रूग्ण आहे.मुंबईत आज १ हजार ३६१ तर नागपूर मनपा क्षेत्रात १ हजार ७३ नवे रूग्ण आढळून आले आहेत.पुणे मनपा क्षेत्रातही आज रूग्णांची संख्या वाढली आहे.आज पुणे मनपा क्षेत्रात ९९३ नवे रूग्ण आढळून आले आहेत.