लस घेतानाही रामदास आठवले यांनी केली ‘भन्नाट’ कविता वाचा काय म्हणाले आठवले !

मुंबई नगरी टीम

मुंबई । राजकीय घटनांवर कवितेच्या माध्यमातून भाष्य करणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोरोनावरील लस घेतानाही त्यावरही कविता केली. “जीवन जगायची ओळखा नस; घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस ; आज आहे माझा सुदिन कारण मी घेतले आहे” कोवॅक्सिन असे काव्य करीत कोविड लस बाबत कोणतीही शंका न बाळगता न घाबरता सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन आठवले यांनी केले.

राज्यात आज अनेक राजकीय नेत्यांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली.काही नेत्यांनी लस घेतानाचे आपले फोटो समाज माध्यमावर शेअर केले आहेत.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्या सह जे जे रुग्णालयात कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला.आपल्या कवितांमुळे परिचित असणा-या आठवले यांनी कोरोनावरील लस घेतानाही हा प्रसंग हलकाफुलका व्हावा म्हणून यावरही कविता केली.जीवन जगायची ओळखा नस; घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस ;आज आहे माझा सुदिन कारण मी घेतले आहे.असे काव्य करून रूग्णालयातील वातावरण बदलून टाकले.

महाराष्ट्रात सध्या कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे.देशात एकूण कोरोना रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात ७० टक्के रुग्णसंख्या वाढत आहे.महाराष्ट्रात कोरोना चा प्रसार वाढणे ही चांगली बाब नाही तर चिंतेची बाब आहे. राज्यात मोठे सार्वजनिक कार्यक्रम गर्दीचे कार्यक्रम बंद करावेत.सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवावे; मास्क वापरावा;सॅनिटाईझर चा वापर करावा कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.

Previous articleMPSC ची परीक्षा येत्या आठ- दहा दिवसांत; विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही
Next article” कर नाही तर डर कशाला” सचिन वाझेंना प्रविण दरेकरांचा सल्ला