शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपात प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेच्या माजी आमदार आणि गेल्या विधानसभा निवडणूकीत मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला आव्हान देत बंडखोरी करणा-या तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.विशेष म्हणजे तृप्ती सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला होता.

शिवसेनेचे माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपात प्रवेश केला आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्याने पोटनिवडणुकीत शिवसेनेने वांद्रे पूर्व मधून तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती.या मतदारसंघातून तृप्ती सांवत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला होता.2019च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्या ऐवजी शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती.त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार महाडेश्वर यांचा पराभव झाला होता.या दोन उमेदवाराच्या भांडणात या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी विजयी झाले.

Previous articleमुख्यमंत्र्यांचे मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं,सत्ता टिकवणं,हेच त्यांचे उद्दिष्ट
Next articleसरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही,त्यांच्या मागण्या आणि सूचनांचा विचार करणार