ताई…मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना धीर !

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करीत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केले होते असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे आणि पंकडा मुंडे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे.यावर राजकीय भेदभाव दूर ठेवत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांना धीर दिला आहे.

माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. गेल्याच आठवड्यात पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या.त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केले होते.मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असावा. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी आज केले आहे.

त्यावर धनंजय मुंडे यांनी ट्विट करीत,ताई, या विषाणूचा सामना मी दोन वेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या.घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या,मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच.प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल,काळजी घ्या…ताई असे रिट्विट करीत पंकजा मुंडे यांना या संकटात धनंजय मुंडे यांना मोठा धीर दिला असल्याचे बोलले जाते.

Previous article१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस पण केव्हापासून ! आरोग्यमंत्र्यांनी केला खुलासा
Next articleकोरोना विरूद्धच्या लढाईत काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी;केली मोठ्या मदतीची घोषणा