जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल होणार; जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या स्तरात आहे ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने गेल्या आठवड्यात राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी पंचस्तरीय सूत्र तयार करण्यात येवून,निर्बंध वाढवण्याचा वा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोरोना परिस्थितीनुसार पाच स्तर तयार करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचे प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली आहे.आज राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेटची आकडेवारी जाहीर केली असून,त्यानुसार येत्या १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे १४ जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे,जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशानवये कळविले आहे.या आकडेवारीच्या आधारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी,४ जून २०२१ रोजीच्या शासन आदेशाचा संदर्भ घेऊन त्यांच्या प्रशासकीय क्षेत्रात कोणत्या स्तराची बंधने लागू करावीत,याबाबतचा निर्णय घेऊ शकतील.एखाद्या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक प्रशासकीय क्षेत्रे असल्यास त्यांनी या आकडेवारीचे प्रमाणबद्ध विभाजन करून एकएका क्षेत्राचा निर्देशांक निश्चित करावा आणि त्यानुसार निर्णय घ्यावा असेही या आदेशात म्हटले आहे.पॉझिटिव्ही रेट जास्त असेल, अशा जिल्ह्यांतील वा शहरातील निर्बंध कायम ठेवण्याची सूचना यात करण्यात आलेली आहे. तर पॉझिटिव्ही रेट ५ टक्क्यांच्या आत असणाऱ्या जिल्ह्यात काही ठिकाणीच निर्बंध ठेवण्याची सूचना आहे.प्रत्येक आठवड्यातील पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध बेडच्या संख्येनुसार स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे.

आज जाहीर करण्यात आलेला प्रत्येक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट खालील प्रमाणे

१) अहमदनगर – २.६३ २) अकोला – ५.३७ ३) अमरावती – ४.३६ ४) औरंगाबाद – ५.३५
५) बीड – ५.२२ ६) भंडारा – १.२२ ७) बुलढाणा – २.३७ ८) चंद्रपूर – ०.८७
९) धुळे – १.६ १० ) गडचिरोली – ५.५५ ११) गोंदिया – ०.८३ १२) हिंगोली – १.२०
१३) जळगाव – १.८२ १४) जालना – १.४४ १५ ) कोल्हापूर – १५.८५ १६) लातूर २.४३
१७ ) मुंबई शहर आणि उपनगर ४.४० १८) नागपूर – ३.१३ १९) नांदेड – १.१९
२०) नंदुरबार – २.०६ २१ ) नाशिक – ७.१२ २२) उस्मानाबाद – ५.१६ २३) पालघर – ४.४३
२४) परभणी – २.३० २५ ) पुणे – ११.११ २६) रायगड – १३.३३ २७) रत्नागिरी – १४.१२
२८) सांगली – ६.८९ २९) सातारा – ११.३० ३०) सिंधुदुर्ग – ११.८९ ३१) सोलापूर – ३.४३
३२) ठाणे – ५.९२ ३३) वर्धा – २.०५ ३४) वाशिम – २.२५ ३५ ) यवतमाळ – २.९१

राज्य भरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सीजन बेडच्या दैनंदिन टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात सदर स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील.याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.

स्तर १- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.
स्तर २ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी २५ ते ४० च्या दरम्यान असेल.
स्तर ३- पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
स्तर ४- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के दरम्यान असेल आणि ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.
स्तर ५- जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.

साधारण मार्गदर्शक तत्त्वे:-

पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर.स्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचालीवर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा,पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगीस्तर तीन, चार आणि पाच साठी जिथे आस्थापना संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडे असण्याचा उल्लेख असेल त्या ठिकाणी असे अपेक्षित आहे की, हे आस्थापना मालक, दुकानदार व सेवा देणारे तसेच ग्राहक पाच वाजेपर्यंत सर्व आटोपून घरी पोहोचतील.ज्या आवश्यक सेवांसाठी लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे त्यात वैद्यकीय, शासकीय कार्यालय, विमानतळ, बंदरे यांची सेवा समाविष्ट असेल. आवश्यक वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासन इतर गोष्टींचा अंतर्भाव करू शकते.

आवश्यक सेवेमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतील :

इस्पितळ, चाचणी केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्र, औषध निर्माण कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्याची वाहतूक करणारे आणि या चैन मध्ये सामील असणारे सर्वांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे लसीचे वितरण, सेनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल.
पशुवैद्यकीय सेवा, जनावरांसाठी आश्रय व पाळीव प्राण्यांसाठी खाद्य दुकाने.
वन विभागाद्वारे घोषित केलेले वन विभागाचे काम
वायु वाहन सेवा- यात विमान, विमानतळ, त्यांची देखरेख, विमान मालवाहतूक, इंधन व सुरक्षा यांचा समावेश होईल.
किराणा दुकाने, भाजी दुकान, फळांचे दुकान, दूध डेरी, बेकरी, मिठाईचे दुकान यांचाही समावेश असेल.
कोल्ड स्टोरेज आणि वखार सेवा.
सार्वजनिक वाहतूक- यात विमान, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस.
विविध देशांच्या मुत्सद्यांच्या कार्यालयात यातील कार्य.
स्थानिक प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व काम
स्थानिक प्रशासनातर्फे सर्व सार्वजनिक सेवा
रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा
सेबीशी संबंधित सर्व कार्यालय
दूरध्वनी सेवे साठी लागणारी सेवा
मालवाहतूक
पाणी पुरवठा सेवा
कृषीशी संबंधित सर्व काम ज्यात बी बियाणे खत कृषी साहित्य आणि उपकरणांचा समावेश असेल.
सर्व वस्तूंचे आयात-निर्यात
ई-कॉमर्स फक्त आवश्यक सेवा आणि सामान
अधिस्वीकृतीधारक पत्रकार
पेट्रोल पंप आणि पेट्रोलची संबंधित उत्पादक
सर्व मालवाहतूक सेवा
डाटा केंद्र, क्लाऊड सेवा, माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित सेवा
शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा
वीज आणि गॅस पुरवठा सेवा
एटीएम आणि डाक सेवा
बंदरे आणि त्याच्याशी संबंधित कार्य
कस्टम हाऊस एजंट, बहुआयामी वाहतूक सेवेतील, जीवनावश्यक औषधी आणि इतर औषध उत्पादनाशी संबंधित आहेत
कच्चा माल पॅकेजिंगसाठी बाल तयार करणारे कंपन्या
मान्सून आणि पावसाळ्याची निगडीत उत्पादन करणारे कंपनी

Previous articleशेतक-यांसाठी आनंदाची बातमी: ‘या’शेतक-यांना शून्य टक्के दराने कर्ज मिळणार
Next articleशेतकऱ्यांनो..कसलीही अडचण आल्यास मला केव्हाही सांगा मी मदत करायला तयार आहे