तोपर्यंत निवडणुका होणार नाही….हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर । कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील महानगरपालिकांसह अनेक निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात निवळत असली तरी राज्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे.जो पर्यंत ७० टक्के लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाही अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. जो पर्यंत ७० टक्के लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे निवडणुकांवरून इशारे देण्यात अर्थ नाही, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसला लगावला.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरही त्यांनी मत व्यक्त केले.स्थानिक पातळीवर काही शिवसैनिकांनी दोन्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केले असतील.मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार कुठेही घडलेले नाही.उलट कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे सदस्य कमी असतानाही जिल्हा परिषदेत सर्वाधिक पदे देण्यात आली. गोकुळ दूध संघातही त्यांना स्थान दिले गेले.उलट दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला हवी.असेही ते म्हणाले.प्रताप सरनाईक यांच्या पत्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केल्याबाबत त्यांना विचारले असता,मुश्रीफ म्हणाले की,त्यांना कधी एकदा सत्तेवर येऊ असे झाले आहे. त्यांच्यातील अस्वस्थता यातून व्यक्त झाली आहे,असे असा टोलाही त्यांनी पाटील यांना लगावला.

Previous articleशरद पवार उद्या दिल्लीत महत्वाचा निर्णय घेणार; प्रमुख विरोधी पक्ष एकत्र येणार
Next articleआशा स्वयंसेविकांचा संप मागे;मानधनात १५०० रुपयांची वाढ,स्मार्ट फोन भेट म्हणून मिळणार