अजितदादांचा वाढदिवस : सुप्रियाताई सुळे देणार छत्र हरपलेल्या बालकांना मायेचा आधार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या २२ जुलै रोजी वाढदिवस असून, कोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे.तर अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कोरोनामुळे आई व वडीलांचे‌ छत्र हरपलेल्या बालकांना मोठा आधार देणा-या “राष्ट्रवादी जीवलग” या उपक्रमाची घोषणा केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या संकटामुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या ऐवजी कोरोना संकटात सापलेल्या लोकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर ‌अजितदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोनामुळे आई व वडीलांचे‌ छत्र हरपलेल्या बालकांना आधार देणा-या “राष्ट्रवादी जीवलग”या उपक्रमाची घोषणा केली आहे.कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मायेचा आधार या माध्यमातून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टद्वारे दिला जाणार आहे.कोरोनामुळे आई व वडीलांचे‌ छत्र हरपलेल्या राज्यातील बालकांचे भविष्य‌ अंधकारमय होते‌ की काय,अशी भीती‌ होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने या मुलांचे पालकत्व घेत त्यांना आर्थिक मदत मिळेल,याची तरतूद केली आहे. त्याचबरोबर या मुलांना आपल्या जवळचे व्यक्तीचे प्रेम,आधार,पाठिंबा,सहकार्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी‌ काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट कडून राष्ट्रवादी‌ जीवलग उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाअंतर्गत ४५० ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ या मुलांचे पालक बनणार आहेत,अशी माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.

Previous articleराज्यात मंदिरे बंद, मात्र डान्सबार सुरू ! पोलिस आयुक्तांना निलंबित करा
Next articleयेत्या आठवड्यात लोकल सुरू करा ! अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा प्रविण दरेकरांचा इशारा