देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांचे पूरग्रस्तांसोबत जेवण; जाणून घेतल्या व्यथा

मुंबई नगरी टीम

सातारा । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तीन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त दौ-यावर असून,त्यांनी आज सातारा जिल्ह्यातील मोरगिरी,आंबेघर येथे पाऊस आणि पूरामुळे संसार उगड्यावर पडलेल्या आणि तात्पुरत्या निवासी शिबिरांमध्ये वास्तव्य असेलेल्या मोरणा विद्यालय मोरगिरी येथिल पूरग्रस्तांना भेटून,त्यांच्यासोबत भोजन करत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

सातारा, सांगली ,कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे तीन दिवसाच्या पूरग्रस्तांच्या दौ-यावर असून,त्यांनी आज सातारा जिल्ह्यातील शिद्रुकवाडी येथिल पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.घर, शेतीचे नुकसान, जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य तातडीने देण्याची गरज असून,त्या ठिकाणी मदतसामुग्री वितरित केली.हे लोक शिबिरात राहत असले तरी त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत करून ते तातडीने करावे लागेल.सुरक्षित जागा शोधून त्यांना नवीन घरे बांधून द्यावी लागतील. पुनर्वसन करताना त्यांच्याशी सल्लामसलत करावी, अशी सूचना त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना यावेळी केली.या नागरिकांना इतर मदत, विविध स्त्रोतांमधून पोहोचते आहे. पण पुनर्वसन हेच प्राधान्य असले पाहिजे. यासाठी घरे आणि रोजगार असा साकल्याने विचार करावा लागेल. भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये,याची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे असे फडणवीस म्हणाले. मोरगिरी,आंबेघर येथे पाऊस आणि पूरामुळे संसार उगड्यावर पडले आहेत,त्यांचे तात्पुरत्या निवासी शिबिरांमध्ये वास्तव्य आहे.दरेकर आणि फडणवीस यांनी मोरणा विद्यालय मोरगिरी येथे या पूरग्रस्तांना भेटून, त्यांच्यासोबत भोजन करत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

सातारा, सांगली ,कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला आहे.यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या तीनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तसेच लोकांना धीर देण्यासाठी व प्रशासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते विविध पूरग्रस्त भागातील दौरे करत आहे.उद्या विरोधी पक्षनेते आपल्या दौऱ्याची सुरवात सांगली जिल्हयापासून करणार आहेत. सकाळी ९.३० वाजता वाळवा तालुका येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असून सकाळी १० वाजता पलूस तालुक्यातील अंकलखोप तर सकाळी ११.१५ वाजता पलूस तालुक्यातील भिलवाडी गावातील पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. दुपारी १ वाजता मिरज तालुक्यातील ढवळी गावाची पाहणी करणार असून दुपारी २ वाजता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत व सायंकाळी ५.३० वाजता कोल्हापूर येथील गुरुदत्त शुगर्स लि. सैनिक टाकळी शिरोळ येथील पुरामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांची भेट घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

Previous articleचिपळूणच्या पुरात लाखोंची रक्कम घेवून एसटीच्या टपावर ९ तास बसलेल्या आगार प्रमुखांचे कौतुक
Next articleपूरग्रस्तांसाठी झटणारे मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल