पूरग्रस्तांसाठी झटणारे मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल

मुंबई नगरी टीम

मुंबई । पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील पूराग्रस्तांसाठी गेली सहा दिवस झटणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली,कोल्हापूर मध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जलसंपदामंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील हे गेली चार दिवस सांगलीतील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी गावागावत फिरत आहेत.पूरग्रस्तांच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर आज मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित होते.ही बैठक सुरू असतानाच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी बैठक अर्धवट सोडून ब्रीच कँडी रुग्णालयाकडे धाव घेतली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जयंत पाटील यांनी पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यातही ते सोबत होते.कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावे आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पाटील यांनी या भागात काही मोटर सायकल,ट्रॅक्टर आणि बोटीचा वापर करत पूरस्थितीची पाहणी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सागंलीकरांना धीर दिला होता.

Previous articleदेवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांचे पूरग्रस्तांसोबत जेवण; जाणून घेतल्या व्यथा
Next articleसरकारचा मोठा दिलासा: खासगी शाळेची फी १५ टक्क्यांनी कमी होणार