पंकजाताईंचा एक फोन अन् ह्रदयाला छिद्र असलेल्या ६ वर्षाच्या बालकावर उपचार सुरू

मुंबई नगरी टीम

बीड । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी एक फोन करताच सिरसाळ्यातील मुस्लिम बांधवाच्या बालकांवर मुंबईच्या नामांकित हॅास्पीटलमध्ये लगेच उपचार सुरू झाले आणि व्याकुळ झालेल्या माता-पित्याच्या चेह-यावरील चिंतेचे सावट दूर झाले.लोकनेत्याच्या कामाची सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा प्रचिती आली याचे हे उदाहरणच म्हणावे लागेल.

त्याचे असे झाले की,सिरसाळा ता.परळी येथील मोईज पठाण या कार्यकर्त्याचे जवळचे नातेवाईक जावेद शेख यांचा मुलगा (६ वर्ष) अबुजर याच्या ह्रदयाला छिद्र होते आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची खूप गरज होती.डॅाक्टरांनी त्याच्या कुटुंबाला मुंबईच्या एसआरसीसी चिल्ड्रन्स हॅास्पीटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. मोईज पठाण हे त्या बालकाला व त्याच्या आई-वडिलांना घेऊन मुंबईत आले पण तिथे कोणी दाद लागू देत नव्हते.शेवटी मोईज यांनी सकाळीच पंकजाताई मुंडे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. पंकजाताईंनी लगेचच हॅास्पीटलचे विश्वस्त जाहेदखान यांना फोन केला व हे माझ्या जवळची माणसं आहेत,त्या बालकांला दाखल करून घ्या आणि उपचार सुरू करा असे सांगितले.या फोननंतर हॅास्पीटलची सुत्रे हलली आणि अबुजर याचेवर लगेच उपचाराची प्रक्रिया सुरू झाली.पंकजाताईंच्या एका फोनमुळे उपचार सुरू झाल्याचे पाहून मोईन व बालकाच्या आजाराने व्याकुळ झालेल्या माता-पित्याच्या चेह-यावरील चिंता दूर झाली.संकटकाळात गरजेच्या वेळी धावून आल्याबद्दल त्यांनी पंकजाताईंचे आभार मानले.

Previous articleपुनर्वसन,अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये कठोर निर्णय घेवून आराखडा तयार करणार
Next articleबारावीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर होणार; ‘या’ वेबसाईटवर निकाल पहा