वाचा-लोकलचा कसा काढायचा,पास कुठे मिळणार,पासासाठी कोणत्या प्रमाणपत्राची आवश्यक्ता असेल ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल प्रवासाबाबत केलेल्या घोषणेनंतर आता दोन डोस घेतलेल्यांना लोकल पास देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे.पासासाठी अथवा तिकिटासाठी लसीकरणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असून,प्रमाणपत्राचा नंबर आणि संबंधित प्रवाशाच्या फोटोच्या आधारावर पास दिला जाईल तसेच हा पास अॅपमार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने पास देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना येत्या १५ ऑगस्टपासून मुंबई लोकलने प्रवास करण्याची घोषणा कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र हा पास केव्हा आणि कसा मिळणार याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम होता.त्याबाबत आज मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी माहिती दिली आहे.सुमारे १९ लाख लोकांनी लसीचे दोन डोस घेतलेले आहेत.लसीचे दोन डोस घेवून १४ दिवस उलटल्यानंतर ओळखपत्र दिले जाणार असून,त्यानंतरच लोकलचा पास दिला जाणार असल्याची माहिती चहल यांनी दिली आहे.लोकलच्या पासासाठी संबंधितांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.प्रमाणपत्रावरील नंबर आणि फोटो पाहून लोकलचा पास दिला जाणार आहे.हा पास अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनेही काढता येईल तसेच ज्यांना ऑनलाईन पास काढणे शक्य नाही त्यांना ऑफलाईन पद्धतीने पास देण्यात येणार आहे.पास घेण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी वॉर्ड ऑफिसमध्येही ऑफलाईन पद्धतीने पास देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती चहल यांनी दिली.दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्ट पासून लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याची घोषणा केल्यानंतर आज मुंबईतील विविध लसीकरण केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांचा ‘तो’ शिक्षकांसोबतचा फोटो तुफान व्हयरल,चर्चा मुख्यमंत्र्यांच्या विनम्रतेची
Next articleनिवडणूका स्वबळावर लढवण्याबाबत मविआतील मंत्र्यांनेच केली मोठी घोषणा