मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ शिक्षकांसोबतचा फोटो तुफान व्हयरल,चर्चा मुख्यमंत्र्यांच्या विनम्रतेची

मुंबई नगरी टीम

सांगली । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरग्रस्त सांगली जिल्ह्याचा दौ-यावर ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता मुख्यमंत्री खुर्चीतून खुर्चीतून उठले आणि त्यांनी विनम्रपणे हात जोडत त्यांचे निवेदन स्वीकारत त्यांचे प्रश्न समजून घेतले.या घटनेचे फोटो समाज माध्यमातून चांगलाच व्हायरल झाला असून,मुख्यमंत्री ठाकरे यांची गुरुजनांप्रतीची असणारी विनम्रता यांची जोरदार चर्चा सध्या माध्यमात पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त सांगली जिल्ह्याचा दौरा करून नुकसानाची पाहणी केली.प्रचंड नुकसानीमुळे जनतेमध्ये रोष असतानाही मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला.सांगली जिल्ह्यातील नुकसानीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्री नागरीकांची निवेदने स्वीकारीत होते.त्याच वेळी ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यावेळी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी मिरजकर यांची ओळख करून दिली.एक शिक्षक आपल्याला निवेदन देण्यासाठी आले आहे असे समजताच मुख्यमंत्री ठाकरे हे खुर्चीतून उठले आणि त्यांनी विनम्रपणे हात जोडले ज्येष्ठ शिक्षक मिरजकर यांच्या अडचणी समजावून घेतले. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री खुर्चीतून उठून निवेदन स्वीकारत आहेत हे बघितल्यावर मिरजकर यांना धक्काच बसला.मुख्यमंत्री ठाकरे यांची गुरुजनांप्रती असणारी विनम्रता मिरजकर यांच्या मनाला स्पर्श करून गेली.यावेळी छायाचित्रकारांनी काढलेला हा फोटो सध्या विविध समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला असून,मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विनम्रतेची चर्चा आहे.

ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर म्हणाले,आम्ही यापूर्वी विविध प्रश्नी अनेक वेळा आम्ही निवेदने देण्यासाठी अधिका-यांकडे गेले आहे.यावेळी आम्ही उभे असायचो आणि अधिकारी निवेदने स्वीकारायचे आणि फोटो काढायचे,मात्र मुख्यमंत्र्यांच्या सांगली जिल्ह्याच्या दौ-यात मात्र आम्हाला धक्काच बसला.आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास गेलो असता,खुर्चीत बसलेले मुख्यमंत्री लगेच उठून उभे राहिले,आमचे निवेदन स्वीकारले एवढेच नाही तर त्यांनी हात जोडून नमस्कार केला याचे आश्चर्य वाटले.यावेळी मुख्यमंत्र्यांची गुरुजनांप्रती असणारी विनम्रता मनाला स्पर्श करून गेली असेही मिरजकर म्हणाले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेल्या सन्मानाने भारावून गेलोच शिवाय हा सन्मान आमच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल असेही त्यांनी सांगितले. निवेदन देताना मिरजकर यांच्यासोबत अनेक शिक्षक होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काढलेला फोटो या शिक्षकांनी एकमेकांना शेअर केला.हा फोटो त्यांनतर अनेक समाज माध्यमांत चांगलाच व्हायरल झाला आणि त्यावर एकच चर्चा होती ती मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विनम्रतेची.

Previous articleनरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय ? नाना पटोले यांचा मोदींवर हल्लाबोल
Next articleवाचा-लोकलचा कसा काढायचा,पास कुठे मिळणार,पासासाठी कोणत्या प्रमाणपत्राची आवश्यक्ता असेल ?