……आणि नारायण राणेंना लागला वीजेचा शॅाक !

मुंबई नगरी टीम

कणकवली । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.राणे यांना बसलेल्या या धक्क्यानंतर त्यांना आज दुसरा धक्का बसला आहे.मात्र आज बसलेला धक्का हा राजकीय नसून, त्यांना जनआशीर्वाद यात्रेदरम्यान वीजेचा धक्का बसला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा कोकणातून जनआशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे.राणे यांची विरोधकांवरील तोफ धडधडत असतानाच आज राणे यांना एक धक्का बसला आहे.मात्र तो कोणताही राजकीय धक्का नसून कणकवली मधील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना रेलिंगला लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईला हात लावला असता राणे यांना वीजेचा शॉक लागला आहे.राणे यांना बसलेला धक्का हा सौम्य होता.यामध्ये त्यांना कसलीही दुखापत झाली नाही.मात्र शॉक लागताच त्यांनी हात बाजूला करून झटकल्याचे स्पष्ट दिसत आहे. राणे यांना शॉक लागल्याचे लक्षात येताच त्याच्या पाठीमागे असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही लगेच सावध होत रेलिंगला लावलेला आपला हात मागे घेतला.

Previous articleसप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये राज्यात कोरोनाची तिसरी लाट ! पुन्हा लॉकडाऊन लागणार का ?
Next articleअजितदादा कॅमेरामॅनला म्हणाले..पोलिसांना उचलायला सांगू का !