किरीट सोमय्या स्थानबद्ध ; शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर केले गंभीर आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे उद्या कोल्हापूर मध्ये जाऊन कारखान्याची पाहणी करून घोटाळ्याची माहिती घेणार होते.मात्र कोल्हापूर मधिल परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी त्यांना कोल्हापूरमध्ये येण्यास मनाई केली आहे.तसेच त्यांना त्यासंदर्भात नोटीसही बजावले आहे.आज सायंकाळी त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधिल मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील मुलूंड भागातील घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने राजकीय वातारवण तप्त झाले आहे.राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करणारे सोमय्या उद्या २० रोजी घोटाळ्याची अधिकची माहिती घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहेत.त्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. परिस्थिती बिघडू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये येण्यास मनाई नोटीस जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमय्याच्या घराबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंतर मी विदर्भातील एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो.हे हाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला आहे.हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.त्यांनी समाज माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे.किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते आतंकवादी आहेत का ? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भाजपा घाबरणार नाही.भाजपा सोमय्या यांच्या पाठीशी आहे. असे पाटील यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सोमय्या यांच्यावर केलेल्या या कारवाईचा निषेध केला आहे.अशा प्रकारे सरकार मुस्कटदाबी करू शकत नसल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.किरीट सोमय्या यांच्यासंदर्भात जी कारवाई राज्यशासन करत आहे ती अत्यंत अयोग्य आहे, त्यांचा मी निषेध व्यक्त करतो.सोमय्या मंत्री हसन मुश्रीफ यांचा कथित घोटाळा उघड करण्यासंदर्भात कागदपत्र एकत्रित करण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते परंतु त्यांच्यावर १४४ कलम लावून त्यांना कोल्हापूरला येण्यासाठी अटकाव घातला.ते देवदर्शन करून कोल्हापूर एक्सप्रेसने जाणार होते. परंतु अशाप्रकारे अटकाव घालून मुस्कटदाबी सरकार करू शकत नाही.लोकशाहिला शोभा न देणारी कारवाई आहे. या कारवाईचा निषेध व्यक्त करतो.कोंबड झाकल तर उजाडायचं राहत नाही.किरीट सोमय्या यांना ज्या कारवाई करायच्या आहे ते करतील अशाप्रकारे सरकारच्या अशा कारवाईने सत्य लपवता येत नाही.ही कारवाई लोकशाहीला मारक आहे व लोकशाहीला विसंगत आहे.अशा शब्दात दरेकर यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.राज्य सरकारविरूद्धचा आमचा संघर्ष सुरूच राहील असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Previous articleतीन राज्य माहिती आयुक्त नियुक्त; अधिसूचना जारी
Next articleसहा वर्षाचा चिमुरडा जयंत पाटील यांना म्हणाला ,साहेब… मी पण फोडू का नारळ ?