सहा वर्षाचा चिमुरडा जयंत पाटील यांना म्हणाला ,साहेब… मी पण फोडू का नारळ ?

मुंबई नगरी टीम

सांगली ।  साहेब… मी पण फोडू का नारळ ? लहानग्या संचितचे निरागस बोल ऐकून जयंतराव पाटलांनी लागलीच त्याची नारळ फोडून शुभारंभ करण्याची इच्छा पूर्ण केली.

ब-याचदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. आज राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या माध्यमातून वाळवाकरांची मने जिंकली आहे.आज वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले.वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना ६ वर्षीय संचित गावडेही त्यावेळी तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून लहानग्या संचितलाही याचे मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करुन करून संचितने नारळ फोडण्याची इच्छा मंत्री जयंतरावांकडे व्यक्त केली. दरम्यान मंत्री जयंतरावांनी कालपासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसात तब्बल ४१ कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ करत धडाका लावला आहे.

Previous articleकिरीट सोमय्या स्थानबद्ध ; शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर केले गंभीर आरोप
Next articleखूशखबर : आता दिल्लीच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार शिक्षण