साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती ! फडणीसांचे पवारांना प्रतित्युत्तर

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री केल्याचे स्पष्टीकरण देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले असता आता फडणवीस यांनी ट्विट करीत पवार यांना प्रतित्युत्तर दिले आहे.साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती ! अशा शब्दात त्यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व कोणी करावे,यासाठी दोन ते तीन नावे पुढे आली होती.नेता निवडीसाठी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते.त्यावेळी महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे यासाठी मी त्यांचा हात वर केला.मात्र उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते.त्यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी नव्हती असे सांगतानाच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता.त्यात माझा थोडा वाटा होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.उद्धव ठाकरे यांना मी लहानपणापासून ओळखत आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे मित्र होते. माझे त्यांच्याशी राजकीय मतभेद असले तरी पण व्यक्तिगत सलोखा अत्यंत जवळचा होता.बाळासाहेब हे दिलदार व्यक्तीमत्व होते.त्यांच्या महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे.राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा सर्वात जास्त आमदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेतृत्व स्वीकारण्यासाठी भाग पाडले असेही पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करीत फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी एक ट्विट करीत पवार यांना प्रतित्युत्तर दिले आहे.द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा ? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती ! अशा शब्दात फडणवीस यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Previous articleदेवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शरद पवार यांनी दिल्या कानपिचक्या
Next articleशिवसेनेचा काँग्रेस,राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून गृह योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार