शिवसेना आता वाघ राहिलेली नाही, तिची मांजर,शेळी झालीय : नारायण राणेंचा प्रहार

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या प्रहार दैनिकातून शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.शिवसेना आता वाघ राहिलेली नाही.तिची मांजर, शेळी झाली आहे. भारतीय जनता पक्ष देशभर आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रात आणि तेही ५६. आयत्या बिळावरचे नागोबा. भाजप महाराष्ट्रात १०६ आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा १४५. भारतीय जनता पक्षाबाबत आणि आमच्या नेत्यांबाबत ही भाषा आपण वापराल आणि बदनामी कराल, तर तुम्ही जे पेरता तेच उगवेल, हे लक्षात ठेवा आणि त्यावेळी काय होईल, याची कल्पना करा. जीभ संयमात ठेवा, जिभेचा सैरावैरा वापर करू नका असा इशारीही त्यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते.यावरूनही केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी प्रहार मधून समाचार घेतला आहे.मुक्यमंत्री म्हणाले की मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले.मात्र आम्हाला माहिती आहे, ते कसे मुख्यमंत्री झाले. याला शिवसैनिक साक्षीदार आहेत. संजय राऊत, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे व आदित्य यांना घेऊन शरद पवार यांच्या घरी पोहोचलात.त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी शिवसैनिक नव्हता. आपण तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे.’याला राऊत यांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचे सोडा. शिवसेना आता वाघ राहिलेली नाही.तिची मांजर, शेळी झाली आहे.भारतीय जनता पक्ष देशभर आहे.तुम्ही फक्त महाराष्ट्रात आणि तेही ५६. आयत्या बिळावरचे नागोबा. भाजप महाराष्ट्रात १०६ आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा १४५. भारतीय जनता पक्षाबाबत आणि आमच्या नेत्यांबाबत ही भाषा आपण वापराल आणि बदनामी कराल, तर तुम्ही जे पेरता तेच उगवेल, हे लक्षात ठेवा आणि त्यावेळी काय होईल, याची कल्पना करा. जीभ संयमात ठेवा, जिभेचा सैरावैरा वापर करू नका असा इशारा त्यांनी प्रहार मधून मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

राणे यांनी प्रहार मधून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचाही समाचार घेतला आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वृत्तांत सामना मध्ये वाचला.मेळाव्यामध्ये जोश आणि दरारा,जो संजय राऊत यांनाच दिसला, तो इतर कोणाला दिसला नाही. मेळाव्याचे फोटो पाहिले. अंतर ठेवून बसलेले शिवसैनिक. अनेकांच्या डोळ्यांसमोर मोबाईल. हॉलमध्ये बसण्याची क्षमता किती ? त्याच्या अर्ध्या संख्येमध्ये जल्लोष काय आणि दरारा काय ? कोणाला दाखविता दरारा ? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात व्हायचा. मेळाव्याला शिवाजी पार्कचे मैदान पुरत नसे. आत शिरायला जागा नसायची. या वेळेचा ‘ऐतिहासिक दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये तुटपुंज्या सैनिकांच्या उपस्थितीत झाला. त्यात कसला जल्लोष आणि कसला दरारा! संजय राऊत हनुमंताचा गणपती करण्यात पटाईत! दांडग्या पैलवानासमोर अपंग माणसाला उभा करून ते त्याच्याही तोंडी शब्द घालतील, ‘या अंगावर! या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडी ‘नामर्द, ‘अक्करमाशा, ‘निर्लज्जपणा असे शब्द येतात आणि त्यांची उजळणी सामना मध्ये होते. याला काय म्हणायचे ? ही भाषा आणि संस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाही असे टीकास्त्रही राणे यांनी सोडले आहे.

Previous articleएनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है ! नाना पटोलेंची टीका
Next articleकोरोनाची दुसरी लाट संपल्यात जमा, पण…आरोग्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ इशारा