अन् पंकजाताई मुंडेंचा नाशकात अचानक सिटी बसमधून प्रवास..!

मुंबई नगरी टीम

नाशिक । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळी अचानकपणे शहरातील सिटी बसमधून प्रवास करत सर्वानाच आश्चर्यचकित केले. हा प्रवास त्यांनी तिकीट काढून केला हे विशेष..

पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत,त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी माऊली नगरातील एका गृह प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम संपून त्या बाहेर आल्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या सिटी बस मध्ये बसल्या, या प्रसंगाने कार्यकर्ते व प्रवाशी आश्चर्यचकित झाले, त्यांचेसमवेत आ. जयकुमार रावल, आ. सीमाताई हिरे, महापौर सतीश कुलकर्णी होते.बसमधील वाहकांकडून तिकिट काढून त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास केला. ही बस सेवा अल्पावधीतच अतिशय उपयुक्त ठरली असून महापालिकेने सुमारे 250 बस यासाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत. या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजाताईंनी महापौरांचे विशेष कौतुक केले.

Previous articleमाझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत ? माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सवाल
Next articleशहा मोदींच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा ; राज्याबाहेर सेनेच्या पहिल्या महिला खासदार